मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर बोलताना पुन्हा एकदा भाषा घसरली.
‘त्यांचं अॅडव्हाईज कोण, त्यांनाच काही कळत नाही. ते काय आम्हाला अॅडव्हाईज करणार? ते काय डॉक्टर आहेत का? तिसऱ्या लाटेचा कुठून आवाज आला त्यांना? आणि ती पण लहान मुलांना? अपशकुनासारखं बोलू नको म्हणाव. त्याला बोलायचा अधिकार तरी आहे का? बाजूला एखादा सेक्रेटरी ठेव आणि बोल म्हणाव. त्या दिवशी नाय का? किती वर्षे झाली देशाला स्वातंत्र्य मिळून? अरे हिरक महोत्सव काय? मी असतो तर कानाखालीच चढवली असती., असं राणेंनी म्हटलं होतं. आता या प्रकरणावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली.
मा. मुख्यमंत्र्यांबद्दल केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलेले वक्तव्य निषेधार्ह आहे. हा महाराष्ट्राच्या जनतेचा अपमान आहे. पंतप्रधान मोदींनी आपल्या मंत्रिमंडळात कसे सहकारी निवडले आहेत याची छोटीशी चुणूक या वक्तव्यावरुन देशाला व महाराष्ट्राला मिळालेली आहे, असं जयंत पाटील यांनी म्हटलं.
मा. मुख्यमंत्र्यांबद्दल केंद्रीय मंत्री @MeNarayanRane यांनी केलेले वक्तव्य निषेधार्ह आहे. हा महाराष्ट्राच्या जनतेचा अपमान आहे. @PMOIndia यांनी आपल्या मंत्रिमंडळात कसे सहकारी निवडले आहेत याची छोटीशी चुणूक या वक्तव्यावरुन देशाला व महाराष्ट्राला मिळालेली आहे – ना. @Jayant_R_Patil pic.twitter.com/fcD8tlBBND
— NCP (@NCPspeaks) August 24, 2021
महत्वाच्या घडामोडी –
अशा कारवाईने आम्ही घाबरणार नाही; राणेंच्या अटकेवर जे. पी. नड्डाांची पहिली प्रतिक्रिया
तुम्ही साहेबांचा रस्त्यात खून करणार आहात; भाजप नेत्याचा गंभीर आरोप
कदाचित त्यांच्या संस्काराचा तो भाग असावा; शरद पवारांचा नारायण राणेंना टोला
“मोठी बातमी! केंद्रीय मंत्री नारायण राणेंना अखेर अटक”