कुडाळ : भाजप नेते व खासदार नारायण राणे यांनी शिवसेनेला हद्दपार करणार, असं वक्तव्य केलं होतं. यावर शिवसेना नेते सतिश सावंत यांनी कुडाळ एमआयडीसी रेस्ट हाउसमध्ये पत्रकार परिषद घेत राणेंच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
शिवसेनेला हद्दपार करण्याची भाषा करणाऱ्या नारायण राणेंना 2024 मध्ये जिल्ह्यातून हद्दपार करण्याचा निर्धार जिल्हावासियांनी घेतला आहे. हद्दपारींची घाई नारायण राणेंना असेल, तर आपले पुत्र आमदार नितेश राणे यांना कणकवली मतदारसंघातून आत्ताच राजीनामा देवून निवडणूक लढविण्यास सांगावे. आमचा सामान्य शिवसैनिक त्यांना हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही, असं म्हणत सतिश सावंत यांनी राणेंवर हल्लाबोल केला आहे.
दरम्यान, 2005 मध्ये राणे काँग्रेसमध्ये गेले त्यानंतर 2014 पर्यंत ते पालकमंत्री होते. त्यावेळी महाराष्ट्रातून शिवसेनेला हद्दपार करणार, असं ते म्हणत होते. पण 2014 पासून ते आजपर्यंत जनतेनं 4 वेळा राणेंना हद्दपार केलं आहे. तसेच आत्ता ज्या भाजपमध्ये राणे गेले आहेत त्याच भाजपचे जुने कार्यकर्ते राणेंना हद्दपार करतील, असं म्हणत सतिश सावंत यांनी राणेंवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे.
महत्वाच्या घडामोडी-
दहावी-बारावीचे वर्ग 23 नोव्हेंबरपासून सुरु करण्याचा विचार- शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड
व्हॉट्सऍप वापरणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; आता व्हॉट्सऍपवरूनही पैसे पाठवता येणार
मुंबई इंडियन्स फायनलमध्ये! बुम-बुम-बुमराची शानदार गोलंदाजी; मुंबईचा दिल्लीवर 57 धावांनी विजय
भाजप म्हणजे उसात शिरलेला हत्ती- सतेज पाटील