मुंबई : केंद्रिय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहलं आहे.
जिल्हा परिषद अध्यक्षा, सिंधुदुर्ग यांच्याकडून प्राप्त झालेल्या निवेदनानुसार, जिल्हा परिषद सिंधुदुर्गने 13वा वित्त आयोगांतर्गत प्राप्त अखर्चित निधी तसेच 14वा वित्त आयोगांतर्गत प्राप्त निधीच्या व्याजाची 89 लाख 91 हजार 951 रुपये इतकी रक्कम शासन आदेशान्वये राज्य प्रकल्प संचालक, राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान, पुणे यांच्या खात्यामध्ये वर्ग केलेली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आरोग्यसेवेची गरज पाहता व सद्य:स्थितीत कोविड-19 चा प्रादुर्भाव पाहता जिल्ह्यातील ३८ प्राथमिक केंद्रांना रुग्णवाहिकांची आवश्यकता आहे, असं नारायण राणेंनी पत्रात म्हटलं आहे.
अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रांतील रुग्णवाहिका निर्लेखित झालेल्या असल्याने आरोग्य सुविधा व सेवा बळकटीकरणासाठी मा. अपर मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभाग यांच्याकडे उपरोक्त रकमेतून सहा रुग्णवाहिका खरेदी करण्यास मंजुरी मिळण्याची विनंती करण्यात आलेली होती. जिल्हा परिषद रायगड, सांगली, सातारा, कोल्हापूर या जिल्हा परिषदांनी सदर योजनांमधील निधीतून रुग्णवाहिका खरेदी केलेल्या आहेत. मात्र जिल्हा परिषद, सिंधुदुर्गचा प्रस्ताव उपरोक्त कार्यालयाकडे अद्यापि प्रलंबित आहे. या संदर्भात जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग यांनी आपल्या विभागाकडे पाठविलेल्या प्रस्तावावर योग्य ती कार्यवाही करावी, ही नम्र विनंती, अशी विनंती नारायण राणे यांनी पत्राद्वारे केली आहे.
महत्वाच्या घडामोडी –
राज ठाकरेंच्या पत्राची मुख्यमंत्री कार्यालयाकडून दखल; कार्यालयाने दिलं ‘हे’ उत्तर
भाजप-मनसे संभाव्य युतीवर नाना पटोलेंचं मोठं विधान; म्हणाले…
“महाराष्ट्राप्रमाणे गोव्यातही चांगली कामगिरी करणारं सरकार शिवसेना देणार”
काँग्रेसच्या ‘या’ ज्येष्ठ नेत्याकडून संघ आणि भाजपचं कौतुक