आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
सिंधुदुर्ग : राजकारणात राजकीय भूकंप येण्याची शक्यता आहे. येत्या मार्चपर्यंत महाराष्ट्रात भाजपचे सरकार स्थापन होईल. आता सर्व काही ठीक होईल, असं वक्तव्य केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलं होतं. यावरून शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी नारायण राणेंवर निशाणा साधलाय.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी अनेकदा सरकार पडेल, अशी विधाने केली होती. त्यामुळे राणेंनी बोलावे आणि महाविकास आघाडी सरकार पडावे, अशी स्थिती नाही. उलट नारायण राणे यांनी आपले मंत्रिपद सांभाळावे. त्यानंतरच महाविकास आघाडी सरकारची काळजी करावी, असं विनायक राऊत यांनी म्हटलं आहे.
हे ही वाचा : भाजपचा राष्ट्रवाद बोगस, त्यांना पुन्हा वर्ण व्यवस्था आणायची आहे; नवाब मलिक यांचा आरोप
दरम्यान, ‘मार्च महिन्यामध्ये भाजपाचे सरकार येईल’ या विधानाचा खासदार विनायक राऊत यांनी समाचार घेतला. नारायण राणे यांच्या अशा वक्तव्याला आम्ही काडीचीही किंमत देत नाही. प्रत्येक वेळी त्यांना बोलून सोडून द्यावे, यामध्येच समाधान मिळते, असही संजय राऊत म्हणाले आहे.
महत्वाच्या घडामोडी –
“मोठी बातमी! महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी किशोर-राजे निंबाळकर यांची नियुक्ती”
“संप आता लवकरच मिटणार?; एसटी कर्मचारी आणि सरकारमध्ये चर्चेस पुन्हा सूरूवात”
शिवेंद्रराजे भोसलेंमुळंच माझा पराभव झाला; आमदार शशिकांत शिंदेंचा मोठा गाैफ्यस्फोट