आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
जळगाव : भाजप खासदार उन्मेष पाटील यांनी बोलताना शिवसेना नेते व जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर टीका केली होती.
कुंपणच शेत खात असेल तर व्यथा कुणाकडे मांडायच्या अशी भावना जिल्ह्यातील शेतकऱ्यांची झाली आहे. पालकमंत्र्यांना बारा महिने झाले आहेत तरी बैठक घ्यायला वेळ नाही. ‘पालक’ या शब्दाचा अर्थ समजून घेतला असता तर या बाबी समोर आल्या असत्या. आता तर, कोरोना लसीकरण झालेलं आहे त्यामुळं आम्ही यासंदर्भात आवाज उठवता येतो का हे पाहणार आहे. तसेच राजकारणाच्या पलीकडे जाऊन वाळू चोरीच्या मुद्यावर लोकांच्यामधून आवाज उठवणार आहे. पालकमत्र्यांनी ठरवलं तर त्यांच्यासाठी ही छोटी बाब आहे, असं उन्मेष पाटील यांनी म्हटलं होतं. यावरून आता गुलाबराव पाटलांनी पलटवार केला आहे.
हे ही वाचा : “मोदी अहंकारी आणि हुकूमशाहीवृत्तीचे; 700 शेतकरी त्यांच्यामुळेच मेले”
आपल्याकडून काहीच होत नाही. त्यांना जिल्ह्यात कुणी विचारत नाही, म्हणून गुलाबराव पाटील नावाचा जप करताय. मागेच मी सांगितलंय की त्यांनी माझ्या नादी लागू नये, नारायण राणे सारख्या नेत्याला मी खपवतो. हे तर चिल्लर आहेत, असं म्हणत गुलाबराव पाटलांनी उन्मेष पाटलांनी केलेल्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
महत्वाच्या घडामोडी –
सरकार पडणार म्हणाऱ्यांमध्ये नारायण राणेंची भर; अजित पवारांचा खोचक टोला
पंकजा ताई काळजी घ्या आणि लवकर बरं व्हा : रोहित पवार
“बाथरूममध्ये कॅमेरा बसवून अभिनेत्री उर्वशी राैतेला करतेय अंघोळ, पहा व्हिडिओ”