मुंबई : विरोधी पक्षनेते देवेन्द्र फडणवीस, भाजप खासदार नारायण राणे, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटिल, मनसे अधक्ष राज ठाकरे यांच्यासह अनेक नेत्यांच्या सुरक्षा कपात राज्य सरकारने कपात केली आहे. यावर नारायण राणे यांनी जर माझ्या जिवाला धोका निर्माण झाला तर त्याला राज्य सरकार जबाबदार असेल, असं म्हटलं होतं. यावर आता शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
राज्यात महाविकास आघाडी सरकार भक्कम आहे तर केंद्रात त्यांच्या पक्षाचे सरकार आहे. मात्र कोणतंही सरकार असलं तरी राणेंना त्यांच्या मुलांपासूनच खरा धोका आहे, असं म्हणत विनायक राऊतांनी राणेंना टोला लगावला आहे.
दरम्यान, निलेश आणि नितेश दोघेही गुंड प्रवृत्तीचे आहेत. निलेश राणेला मतदारांनी घरी बसवलं. नितेश राणेकडे चांगले गुण असल्यामुळे तो पुढे जाईल असं वाटत होतं. मात्र त्यांची गुंडप्रवृत्ती त्यांना घरात बसविल्याशिवाय राहणार नाही, असं म्हणत राऊतांनी राणे बंधूंवर निशाणा साधला आहे.
महत्वाच्या घडामोडी-
मुख्यमंत्री महोदय काय चाललंय आपल्या राज्यात?; बलात्काराच्या घटनांवरुन चित्रा वाघ कडाडल्या
एकीकडे सत्तेत राहून आंदोलन करायचे आणि…; सदाभाऊ खोत यांची राजू शेट्टींवर टीका
“सुरक्षा कपातीसारख्या राजकीय उठाठेवी करण्यापेक्षा जनतेच्या हिताकडं लक्ष द्या”
नितेश राणे हे हँग आहेत, त्यांना काही कळत नाही; शिवसेनेची टीका