आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : वेंगुर्ला नगरपालिकेच्या उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या नेतृत्वात भाजपने महाविकास आघाडीला पराभूत केलं आहे.
भाजपच्या उपनगराध्यक्ष पदाच्या उमेदवार शितल आंगचेकर यांनी महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षाचे उमेदवार नगरसेवक विधाता सावंत यांना 10 विरुद्ध 7 अशा मताने हरवलं आहे.
दरम्यान, हा वेंगुर्ल्याचे काँगेस पक्षाचे नेते विलास गावडे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. वेंगुर्ला गावडे यांचा बालेकिल्ला मानला जातो. गावडे यांचे कट्टर समर्थक असलेले नगरसेवक विधाता सावंत यांना पक्षाने उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. यानंतर काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला होता.
महत्वाच्या घडामोडी –
गुजरातमध्ये 21 कोटींचे ड्रग्ज सापडलं त्याचं काय?; संजय राऊतांचा सवाल
उत्तर प्रदेश हे राम राज्य नाही, तर किलींग राज्य; ममता बॅनर्जींचा हल्लाबोल
आगामी काळात शिवसेना बॅक टू पॅव्हेलियन होऊ शकते; रामदास आठवलेंच्या विधानानं राजकीय चर्चांना उधाण
“आगामी महापालिका निवडणुकीसाठी भाजपची ‘या’ पक्षासोबत युती?”