नारायण राणेंना कामधंदा उरला नाही, घरी एक बोलतात, बाहेर वेगळंच; शिवसेनेच्या ‘या’ नेत्याचे राणेंना प्रत्युत्तर

0
134

जळगाव : पैसे कमावणे हा शिवसेनेचा एकमेव धंदा आहे, असं म्हणत भाजपचे नेते नारायण राणे यांनी शिवसेनेवर सडकून टीका केली होती. या टीकेला आता शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी जाेरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

नारायण राणे हे सुशिक्षित बेरोजगार राजकारणी आहेत. आता त्यांना काहीही कामधंदा उरलेला नाही. ते घरी काही बोलतात, बाहेर काही वेगळेच बोलतात. शेवटी त्यांना अशी विधाने करुन स्वतःचा टीआरपी म्हणजेच प्रसिद्धी मिळवायची असते,  अशी घणाघाती टीका गुलाबराव पाटील यांनी केली आहे.

दरम्यान, नारायण राणे स्वतः मुख्यमंत्री असताना कोकणात कोणताही नवीन प्रकल्प आणू शकले नाहीत. त्यामुळे त्यांनी बाकीच्या गोष्टींविषयी तर काही बोलूच नये. ते जर असे काही बोलले नाहीत, तर त्यांच्याकडे कुणी लक्ष देत नाही, असा चिमटा देखील गुलाबराव पाटील यांनी यावेळी राणेंना काढला.

महत्वाच्या घडामोडी-

वेळ पडल्यास विरोधीपक्षाच्या नेतृत्वात बेळगावात आंदोलन करु, ते यायला तयार आहेत का? संजय राऊतांचा सवाल

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख होतोय पाहून शरद पवार संतापले अन्…

“केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांची कोरोना चाचणी निगेटीव्ह”

शरद पवारांच्या उपस्थितीत कराडमध्ये बैठक, उदयनराजेंनी उपस्थिती टाळली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here