नारायण राणेंना सूक्ष्म खातं मिळालं, त्यामुळं त्यांचं डोकंही सूक्ष्म झालंय- गुलाबराव पाटील

0
520

मुंबई : एकनाथ शिंदे शिवसेनेत कंटाळले असून, ते केवळ सही पुरतेच मंत्री आहेत. मातोश्रीशिवाय ते एक सहीपण करू शकत नाहीत. आमच्याकडे आले तर त्यांना सन्मानाने घेऊ, असं केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी म्हटलं होतं. यावर शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना सूक्ष्म उद्योग खाते मिळाले आहे, त्यामुळे त्यांचं डोकंही सूक्ष्म झालं आहे. त्यामुळे ते एकनाथ शिंदे शिवसेनेवर नाराज असल्याचं म्हणत आहेत, असा टोला गुलाबराव पाटलांनी यावेळी लगावला. ते पत्रकारांशी बोलत होते.

दरम्यान, नारायण राणे पहिले किती दिवस अस्वस्थ होते हे आपण पाहिलं आहे, त्यामुळे त्यांचा अस्वस्थपणा निघाला आहे. पहिला ते शिवसेनेत अस्वस्थ होते, त्यानंतर ते काँग्रेसमध्ये अस्वस्थ झाले. आता भाजपमध्ये गेल्यानंतर त्यांना सूक्ष्म लघु उद्योग खातं मिळालं आहे. त्यामुळे त्यांचं डोकेही सूक्ष्म झालं आहे, अशी टीका गुलाबराव पाटलांनी यावेळी केली.

महत्वाच्या घडामोडी –

“मोदींचा पराभव करता येतो, हे महाराष्ट्र आणि बंगालने दाखवून दिलंय”p

एकनाथ शिंदे यांची घुसमट होत असेल आणि…; आशिष शेलारांचं सूचक वक्तव्य

“आघाडी सरकारमध्ये काँग्रेसची अवस्था प्रचंड वाईट, स्वाभिमान नावाचा अवयव काँग्रेसमध्ये राहिला नाही”

“ज्या महापाैरांच्या कार्यक्रमाला गर्दी होते, त्या जनआशिर्वाद यात्रेवर कशा बोलू शकतात?”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here