नारायण राणे दिल्ली दौऱ्यावर; मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची चिन्हं

0
521

मुंबई : भाजपचे राज्यसभेचे खासदार नारायण राणे हे दिल्लीला रवाना झाले आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर नारायण राणे  यांचा हा दौरा महत्त्वाचा आहे. नारायण राणे यांची केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळते का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

नारायण राणे हे दिल्ली दौऱ्यात भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांची भेट घेणार आहेत. नारायण राणे यांच्या मेडिकल कॉलेजच्या उद्घाटनासाठी गृहमंत्री आणि भाजपचे माजी अध्यक्ष अमित शाह हे कोकणात आले होते. नारायण राणे हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. त्यांनी शिवसेना सोडल्यानंतर काँग्रेसमध्ये आणि त्यानंतर भाजपमध्ये प्रवेश केला.

दरम्यान, भाजपने त्यांना राज्यसभेवर पाठवलं. महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटला असताना, मराठा चेहऱ्याच्या निमित्ताने नारायण राणे यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश केला जाऊ शकतो.

महत्वाच्या घडामोडी –

“दिशाभूल करणं आमच्या रक्तात नाही, उदयनराजे आणि माझं सर्वच मुद्द्यांवर एकमत”

सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येच्या नावावर भाजपाला बिहार निवडणूक लढवायची होती- नवाब मलिक

राजकारण चंचल नसतं, शिवसेनेची विचारधारा चंचल झाली आहे- प्रवीण दरेकर

ह्यांचं फक्त एकच काम, याला फोडा त्याला जोडा; अशोक चव्हाणांची भाजपवर जोरदार टीका

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here