“नारायण राणेंना ‘पब्लिसिटी स्टंट’चा मोह आवरता आला नाही”

0
390

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना पब्लिसिटी स्टंटचा मोह आवरता आला नाही, असं म्हणत राणेंच्या जन आशीर्वाद यात्रेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते क्लाईड क्रास्टो यांनी टीका केली आहे.

राज्यात अद्यापही कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे . या पार्श्वभूमीवर जन आशीर्वाद यात्रा काढून गर्दी जमवणं हे लोकांच्या आरोग्याशी खेळणं आहे हे नारायण राणे यांना कळायला हवं होतं. ते अमित शहा किंवा जे. पी. नड्ढा यांना तसे सांगू शकले असते. परंतु पब्लिसिटी स्टंटचा मोह केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना आवरता आला नाही. त्यासाठी त्यांनी लोकांचं आरोग्य वेठीस धरलं आहे, क्लाईड क्रास्टो यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, भाजपाच्या जन आशीर्वाद यात्रेची पोलखोल करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने 21 ऑगस्टपासून पत्रकार परिषदांचे आयोजन करण्यात आले आहे. यासंदर्भातील पहिली पत्रकार परिषद वसई येथे पार पडली.

महत्वाच्या घडामोडी –

‘या’ तालुक्यात भाजप-शिवसेना युती कायम; भाजप खासदाराची माहिती

“उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांचं निधन”

…तेंव्हा राज ठाकरेंना शरद पवारांबद्दल कळलं नाही का?; हसन मुश्रीफांचा सवाल

“नीलम गोऱ्हेंना शिवसेनेत मी आणलं, माझ्यावर टीका करुन कदाचित त्यांना मंत्रीपद मिळेल”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here