मुंबई : राज्याचा अर्थसंकल्प हा फक्त पुण्याभोवती केंद्रीत महाराष्ट्रातील जनतेच्या डोळ्यात धूळफेक अर्थसंकल्प आहे. टिव्हीवर सुरू असणाऱ्या जाहिराती बघा, या जाहिराती बघून लोक शिव्या घालत आहेत, असं म्हणत भाजपचे नेते नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे.
राज्याच्या उत्पन्नात प्रचंड मोठी तुट आहे. अजूनही कोरोना संपलेला नाही. अजूनही उत्पन्न कमीच येणार असं वाटत असताना अर्थसंकल्पात दावा केला एवढे पैसे कोठून येणार आहेत? दीड लाख कोटी उत्पन्न कमी असताना एवढ्या गोष्टींसाठी पैसे कुठून आणणार? सरकारने फक्त घोषणा केल्यात, एकही तरतूद केलेली नाही, असं नारायण राणे म्हणाले.
दरम्यान, अर्थमंत्र्यांनी हा बजेट फोडला आहे. कोकणाच्या कोणत्या योजनेला पैसा दिला? कोकणाला काहीच दिलं नाही. आमच्या इकडे चक्रीवादळाला एक रूपयाही आला नाही. टिव्हीवर सुरू असणाऱ्या जाहिराती बघा, या जाहिराती बघून लोक शिव्या घालत आहेत. त्यांनी तीन महिने दिलेत, पण मी तर म्हणतो की हे सरकार एकही दिवस राहू नये,” असंही नारायण राणे यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी –
“भारत विरूद्ध इंग्लंड टी-20 सामना! इंग्लंडने टाॅस जिंकला, प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय”
‘वाजले की बारा’ व्हायरल लावणीसम्राट रिक्षाचालक बाबजी कांबळे यांना थेट चित्रपटात काम करण्याची ऑफर
“उद्धव ठाकरे साहेब तुमची गाठ माझ्याशी आहे, इथले सगळे हिशेब द्यावेच लागतील”
“चंद्रकांत दादा तुम्ही अविश्वास ठराव तर आणा, मग आघाडी किती भक्कम आहे हे तुम्हांला कळेल”