आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
औरंगाबाद : महानगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी कारवाईत घर गेल्यामुळे बेघर झालेल्या औरंगाबादच्या लोक गायिका कडूबाई खरात यांना घर देण्याचा शब्द कांग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी एका कार्यक्रमात दिला होता. आणि अवघ्या दोन महिन्यातच नाना पटोलेंनी त्यांना घर देऊन वचनपूर्ती केली आहे. यानंतर कडुबाईंनी यावेळी नाना भाऊच निवडून येतील आणि मुख्यमंत्री होतील या आशयाचे गीत सादर केले.
सोमवारी गोकुळधाम सुंदरवाडी येथे नाना पटोले यांच्या हस्ते व राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख, गृह राज्यमंत्री सतेज पाटील, प्रदेश कार्याध्यक्ष चंद्रकांत हंडोरे, शिवाजीराव मोघे यांच्या उपस्थितीत कडूबाई खरात यांनी आपल्या हक्काच्या नव्या घरात गृहप्रवेश केला.
हे ही वाचा : समीर वानखेडेंच्या अडचणी वाढणार; दिलीप वळसे पाटलांकडून संकेत
दरम्यान, कडूबाई खरात यांचे घर अतिक्रमण हटाव मोहिमेत पाडण्यात आले होते. त्यांचा संसार उघड्यावर आला होता. दोन महिन्यापूर्वी मागासवर्गीय मेळाव्यात त्यांनी माजी सामाजिक न्यायमंत्री व प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष चंद्रकांत हंडोरे यांना भेटून आपल्यावर ओढवलेल्या प्रसंगाची माहिती देऊन मदत करण्याची विनंती केली होती. चंद्रकांत हंडोरे यांनी नाना पटोले यांना कडुबाई खरात यांना घर देण्यासंदर्भात मदत करण्याची विनंती केली असता त्याच मेळाव्यात नाना पटोले यांनी कडूबाई खरात यांनी घर देण्याचे आश्वासन दिले होते.
महत्वाच्या घडामोडी –
“Breaking News! भारत-पाक सामन्यानंतर हार्दिक पांड्याच्या प्रकृतीत बिघाड, रूग्णालयात केलं दाखल”
‘ठाकरे सरकार ड्रग्स माफियांच्या तालावर नाचतेय; अतुल भातखळकरांची टीका