Home नागपूर नाना पटोले कुणाच्याही दबावात येत नाही, त्यांच्या बापाशी लढून मी…; नाना पटोले...

नाना पटोले कुणाच्याही दबावात येत नाही, त्यांच्या बापाशी लढून मी…; नाना पटोले भाजपवर कडाडले

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

नागपूर : विधान परिषदेच्या नागपूर स्वराज्य संस्था मतदारसंघात मतदानाच्या 15 तास आधी काँग्रेसने आपला उमेदवार बदलण्याचा निर्णय घेतला. यामुळे काँग्रेसमधील अनागोंदी पुन्हा उघड झाली आहे. यानंतर भाजप प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया देत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर टीका केली होती.

हे ही वाचा : आगामी निवडणूकीत सेना-राष्ट्रवादी एकत्र येणार का?; राज ठाकरेंच्या उत्तराने सर्वांना हसू आवरलं नाही

नाना पटोले हे हतबल झाले आहेत. दोन मंत्र्यांच्या दबावाखाली नाना पटोले यांनी काँग्रेसने उमेदवार बदलला. त्यामुळे नाना पटोले यांनी राजीनामा द्यावा, असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं होतं. यावरून आता नाना पटोले यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

नाना पटोले कुणाच्या दबावात येत नाही, तर दबाव टाकतो, असा जोरदार पलटवार नाना पटोलेंनी यावेळी केला. तसेच ज्यांनी हा आरोप केलाय. त्यांच्या बापाशी लढून मी त्या पक्षामधून बाहेर पडलोय. हे त्यांनी विसरू नये, असा घणाघात नाना पटोलेंनी यावेळी केला.

दरम्यान, आमच्यावर टीका करणारे आणि आपला राजीनामा मागणारे चंद्रशेखर बावनकुळे कोण आहेत?, असा सवालही नाना पटोलेंनी यावेळी केला.

महत्वाच्या घडामोडी –

“लग्नात ग्रँड एन्ट्री घेत असताना नवरा-नवरीची झाली फजिती, पहा व्हिडिओ”

संजय राऊतांवर गुन्हा दाखल, मग योगी आदित्यनाथांवरही गुन्हा दाखल होणार का?- नवाब मलिक

मनसेच्या होर्डिंगवर ‘जय श्रीराम’; राज ठाकरेंच्या दौऱ्यापूर्वी औरंगाबाद शहरभर बॅनरबाजी