मुंबई : मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळाचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार 3-4 दिवसांपूर्वी पार पडला. यामध्ये अनेक नव्या चेहऱ्यांना संधी मिळाली आहे तर जुन्या मंत्र्यांना डच्चू मिळाला आहे. यावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला.
पेट्रोल, डिझेल, गॅस आणि जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती भरमसाठ वाढवल्याने सर्व प्रकारची महागाई वाढली असून लोकांचं जगणं मुश्कील झालं आहे. सरकारचं अपयश झाकण्यासाठी मंत्रिमंडळातील चेहरे बदलून चालणार नाही तर पंतप्रधानच बदलण्याची गरज आहे, असा घणाघात नाना पटोलेंनी यावेळी केला. यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली.
नाना पटोले हे पप्पू आहेत. केंद्रात जसे एक पप्पू आहेत, तसेच महाराष्ट्रात देखील एक पप्पू आहेत. ते त्यांच्या तोंडाला येईल ते बोलत असतात, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी नाना पटोलेंना यावेळी लगावला. त्यासोबतच सहकार खात्याचं नियोजन किमान वर्षभरापूर्वीपासून झालं असेल. या खात्यामुळे देशातील सहकार क्षेत्राला बळकटी मिळेल, असंही चंद्रकांत पाटील यांनी यावेळी म्हटलं.
महत्वाच्या घडामोडी –
…पण आज जगात आपला देश कुठे आहे?; भाई जगताप यांचा मोदी सरकारला टोला
“रामदास आठवले साहेब, राष्ट्रपती व्हावेत ही माझी मनापासून इच्छा”
“नारायण राणेंना पंतप्रधान केलं, तरी शिवसेनेला दु:ख वाटण्याचं कारण नाही”
…तर मी विधानसभा अध्यक्ष होण्यास तयार, पण शिवसेनेनं वनमंत्रीपद सोडू नये- भास्कर जाधव