Home महाराष्ट्र “नाना पटोले अडाणी भाषेत टीका करतात, मग रावसाहेब दानवेंनी केली तर मिरच्या...

“नाना पटोले अडाणी भाषेत टीका करतात, मग रावसाहेब दानवेंनी केली तर मिरच्या का झोंबल्या?”

मुंबई : बैलगाडी शर्यतीवरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. यातच केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा एक व्हिडिओ समाजमाध्यमांंमध्ये चांगलाच गाजत आहे.

रावसाहेब दानवेंची या व्हिडीओत काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर टीका करताना जीभ घसरली आहे. दानवे यांनी राहुल गांधी यांना काम न करणारा बैल असं म्हटलं. यावरून काँग्रेस नेते आक्रमक झाल्याचं पहायला मिळत आहे. यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया देत भाजपवर हल्लाबोल केला. यावरून आता भाजपचे राज्य प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी पटोलेंच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे.

नाना पटोले हे नेहमीच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींवर तसेच राज्यातील भाजप नेत्यांवर एकेरी शब्दात आगपाखड करतात. अडाणी भाषेची त्यांची संस्कृती आहे. मग केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी राहुल गांधींवर टीका केली तर काँग्रेसवाल्यांच्या नाकाला मिरच्या का झोंबल्या?, असा प्रश्न राम कुलकर्णी यांनी यावेळी केला.

महत्वाच्या घडामोडी –

14 महिने मंत्रालयात न येणारा मुख्यमंत्री उत्कृष्ठ कसा?; चंद्रशेखर बावनकुळेंचा सवाल

महाराष्ट्रातील सर्व पत्रकारांना टोलमाफी; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची घोषणा

भुजबळ जेलमधून आल्यानंतर संपल्यात जमा आहेत, त्यामुळे…; नारायण राणेंची टीका

मंत्रिमंडळातून काढा; काँग्रेसच्या ‘या’ नेत्याचे स्वतःच्या पक्षाच्या नेत्याविरुद्ध मुख्यमंत्र्यांना पत्र