आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
अजित पवार भाजपसोबत गेल्यानंतर बारामती लोकसभा मतदारसंघात पवार कुटुंबातील दोन व्यक्तींमध्ये मोठी लढत होत आहे. सुप्रिया सुळे विरूद्ध सुनेत्रा पवार अशी ही लढत आहे. यावर प्रतिक्रिया देताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
ही बातमी पण वाचा : ‘ईडी लावा, पक्ष फोडा अन्…’; जयंत पाटलांचा भाजपवर निशाणा
भाजपने घरात भांडणं लावली आहेत. पवार विरुद्ध पवार असा संघर्ष लावला. आधी 70 हजार कोटींचा आरोप केला. नंतर अजितदादांना मंत्री मंडळात घेतलं. अजित पवार यांच्याबद्दल काय बोलावं मला कळत नाही. भाजप जे करत आहे, ती राज्याची संस्कृती नाही. भाजप खालच्या पातळीवर जात राजकारण करत आहे हे भाजपला महागात पडेल, असं नाना पटोले म्हणाले आहेत.
नरेंद्र मोदींची राज्यातील भाषणं बघा पाण्यावर शेतीवर ते काहीच बोलत नाहीत. प्रधानमंत्री शेतकरी आत्महत्या यावर बोलतच नाहीत. जे लोक सोबत आहेत. त्यांच्या कारखाना पाहिला आणि 200 कोटी रुपये देण्यात आले. इतरांवर मात्र कारवाई केली, असंही नाना पटोले यांनी म्हटलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
‘…तर टक्कल करुन फिरेन’; मनसे नेत्याचं विनायक राऊत यांना आव्हान
मोठी बातमी! देवेंद्र फडणवीसांकडून मोठ्या राजकीय भूकंपाचे संकेत?
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस लवकरच…; प्रकाश आंबेडकरांचं मोठं विधान
‘…म्हणून मी भाजपसोबत गेलो” ; अजित पवारांचा मोठा खुलासा