नागपूर विधान परिषद निवडणूक; काँग्रेसला धक्का, भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे विजयी

0
295

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

नागपूर : महाराष्ट्रातील विधानपरिषदेच्या नागपूर येथील जागेवर भाजपच्या चंद्रशेखर बावनकुळे यांचा विजय झाला आहे.

हे ही वाचा : नाना पटोले कुणाच्याही दबावात येत नाही, त्यांच्या बापाशी लढून मी…; नाना पटोले भाजपवर कडाडले

काँग्रेसनं छोटू भोयर यांच्या जागेवर अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना पाठिंबा दिल्यामुळं त्यांचा पराभव झाला आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांना 362 मतं मिळाली आहेत. काँग्रेस समर्थित उमेदवार 186 मतं मिळाली आहेत. तर, छोटू भोयर यांना 1 मिळालं आहे.

दरम्यान, विधान परिषदेच्या नागपूर स्वराज्य संस्था मतदारसंघात मतदानाच्या 15 तास आधी काँग्रेसने आपला उमेदवार बदलण्याचा निर्णय घेतला. मतदानाच्या आदल्या दिवशी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी पत्रक काढत अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना पाठिंबा जाहीर केला. काँग्रेसच्या नेत्यांमध्येच उमेदवारीवरुन दोन गट पाहायला मिळाले. त्यामुळे भाजपनं याचा फायदा घेत विजय मिळवला.

महत्वाच्या घडामोडी –

आगामी निवडणूकीत सेना-राष्ट्रवादी एकत्र येणार का?; राज ठाकरेंच्या उत्तराने सर्वांना हसू आवरलं नाही

“लग्नात ग्रँड एन्ट्री घेत असताना नवरा-नवरीची झाली फजिती, पहा व्हिडिओ”

संजय राऊतांवर गुन्हा दाखल, मग योगी आदित्यनाथांवरही गुन्हा दाखल होणार का?- नवाब मलिक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here