“आमच्या घरात माझ्यापेक्षा माझ्या बायकोला पगार जास्त आहे”

0
1258

मुंबई : विरोधी पक्षनेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लिहिलेल्या ‘अर्थसंकल्प सोप्या भाषेत’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी भाषण केलं. यावेळी बोलताना माझ्यापेक्षा माझ्या बायकोला पगार जास्त आहे, असं मिश्किलपणे फडणवीस म्हणाले.

राज्याचं बजेट आणि आपल्या घरचं बजेट यात जास्त काही फरक नसतो. एवढंच की राज्याचं बजेट जरा व्यापकं असतं. आपण जेव्हा घरचं बजेट तयार करतो तेव्हा सगळ्यांच्या पगाराचा विचार करतो. आता माझ्यापेक्षा आमच्या घरात माझ्या बायकोला पगार जास्त आहे, असं म्हणत फडणवीसांनी उपस्थितांमध्ये हशा पिकवला.

2005 मध्ये अर्थसंकल्प म्हणजे नेमकं काय? हे पुस्तक लिहिलं होतं. त्यानंतर बरेच बदल झाले. अर्थसंकल्पाशी निगडीत कायदेही बदलले. त्यामुळे नव्या संकल्पनांसहीत हे पुस्तक लिहिलं आहे. हे पुस्तक पीएचडी करणाऱ्यांसाठी नसून सर्वसामान्य लोकांनाही अर्थसंकल्प कळावा या हेतूने लिहिलं आहे, असंही फडणवीस म्हणाले.

दरम्यान, पुस्तक लिहितानाच ते 40 मिनिटांत वाचून होईल 45 मिनिटं लागताच कामा नये, हा हेतू ठेवूनच लिहिलं असल्याचं फडणवीस म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी-

…तर आम्ही शिवसेनेला पाठिंबा देऊ- सुधीर मुनगंटीवार

जोपर्यंत मी आहे तोपर्यंत मोदी आहेत; रामदास आठवलेंच वक्तव्य

मी मोदींच्या मार्गाचा अवलंब करेन; त्यांनी सोशल मीडिया सोडलं तर मीही सोडेन

रश्मी वहिनींकडून मला अशा टीकेची अपेक्षा नाही- चंद्रकांत पाटील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here