माझ्या बोलण्याचा विपर्यास केला गेला, महिलांचा अपमान करणं हा माझा स्वभाव नाही- आशिष शेलार

0
398

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : महापौर किशोरी पेडणेकर आणि भाजपा नेते आशिष शेलार यांच्यातील वाद पोलीस स्टेशनपर्यंत पोहचला. पेडणेकर यांच्याविरोधात अपशब्द वापरल्याप्रकरणी शेलार यांच्यावर मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. आता यावर आशिष शेलार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

हे ही वाचा : आशिष शेलारांवर गुन्हा दाखल; देवेंद्र फडणवीसांचा शिवसेनेवर गंभीर आरोप, म्हणाले…

मी जे बोललोच नाही, आणि जे बोललो त्याचा विपर्यास करुन जो बागुलबुवा उभा केला आहे, त्या विरोधात माझी बाजू सक्षमपणे न्यायालयात मांडेन, असं सांगतानाच महिलांचा अपमान करणे हा माझा स्वभाव नाही, तसा आमचा संस्कारही नाही, असं आशिष शेलार यांनी यावेळी स्पष्ट केलं. ते माध्यमांशी बोलत होते.

दरम्यान, ज्या पत्रकार परिषदेवरुन हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्या पत्रकार परिषदेचा व्हिडीओ आजही युट्युबवर उपलब्ध आहे. त्यातील सत्य, जे सत्ताधारी पक्षाला बघायचे नसले तरी ते न्यायालयासमोर आम्ही मांडू. माझा न्याय व्यवसस्थेवर विश्वास आहे. सत्य समोर येईलच, असा दावाही शेलारांनी यावेळी केला.

महत्वाच्या घडामोडी –

2024 मध्ये उद्धव ठाकरेच पुन्हा मुख्यमंत्री होतील; राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याचा विश्वास

पंकजा मुंडेंनी कार्यकर्त्यांना लिहिलं भावनिक पत्र, म्हणाल्या…

मोठी बातमी! भाजप नेते आशिष शेलार यांच्यावर गुन्हा दाखल; किशोरी पेडणेकरांनी केली पोलिसात तक्रार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here