माझं पुढील लक्ष्य रश्मी वहिनी; किरीट सोमय्यांचा इशारा

0
459

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आता थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनाच लक्ष्य केलं आहे. रश्मी ठाकरे यांच्या नावाचा वापर करत बंगले खरेदी केल्याचा मोठा दावा किरीट सोमय्यांनी यावेळी केला आहे.

माझं पुढील लक्ष्य रश्मी वहिनी आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी रश्मी वहिनींच्या नावाचा वापर करत बंगले खरेदी केले, असा गंभीर आरोप किरीट सोमय्या यांनी केला. आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यासाठी किरीट सोमय्या कोल्हापूरकडे रवाना झाले. यावेळी ते बोलत होते.

ठाकरे सरकारने यापूर्वी विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी लाठ्या काठ्यांनी मारण्याचा प्रयत्न केला. मला कोल्हापूरला जाण्यासाठी रोखण्यासाठी प्रयत्न केला तर महाविकास आघाडीतील नेत्यांचे घोटाळे उघड करणार, असं किरीट सोमय्यांनी म्हटलं आहे.

मी सबळ पुराव्यांशिवाय आरोप करत नाही. संजय राऊत, अनिल परब, आनंदराव अडसूळ हे सध्याचे उदाहरण आहेत. कोल्हापूर पोलिस अधीक्षकांना लाज वाटायला हवी, ते सरकारच्या कामांसाठी काम करतात. मला कुणीही थांबवू शकत नाही. मी माझ्या निर्णयावर ठाम आहे. कोल्हापुरात जाणार तिथे तिसरा डोळा बाहेर काढणार, असं किरीट सोमय्या म्हणाले आहेत.

महत्वाच्या घडामोडी –

“…म्हणून महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं”

“अखेर मनसे-भाजप युतीवर शिक्कामोर्तब; राज्यातील ‘या’ जिल्ह्यात पहिली युती जाहीर”

“गोव्यात काँग्रेसला मोठा धक्का?; माजी मुख्यमंत्री करणार तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश”

“सोलापूरात मनसेचा झंझावात; नामांकित लोकांनी केला मनसेत प्रवेश”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here