मुंबई : वीजबिलाच्या मुद्द्यावरून मनसेनं सोमवारी वीज दरवाढी विरोधात आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. तसेच यासंदर्भात मनसेकडून संपूर्ण दादर-माहीम परिसरात होर्डिंग्ज देखील लावण्यात आले आहेत.
मनसेचे विभाग प्रमुख यशवंत किल्लेदार यांनी हे होर्डिंग लावलं आहे. तसेच हे होर्डिंग्ज लावताना त्यांनी ठाकरे सरकारच्या माझे कुटुंब,माझी जबाबदारी या वाक्याला टार्गेट केलं आहे.
मनसेकडून लावण्यात आलेल्या होर्डिंग्जवर माझे लाईट बिल, माझी जबाबदारी, तर सोमवारी भेटूच… शॉकसाठी तयार राहा, असं लिहिण्यात आलं आहे.
दरम्यान, सर्वसामान्य नागरिकांचा विचार करणं ही मुख्यमंत्र्यांची जबाबदारी आहे. आम्ही त्यांना केवळ त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून देतोय आणि त्यासाठी ही होर्डिंगबाजी करण्यात आली आहे, असं किल्लेदार यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी-
पदवीधर निवडणुकीनंतर महाराष्ट्रातील सरकार बदलणार- प्रविण दरेकर
तू तुझा प्रचार जोरात कर, बाकी मी बघतो; राज ठाकरेंचा रूपाली पाटील ठोंबरेंना मेसेज
राज्य सरकार घोषणा करतं आणि पलटतं, त्यांची भूमिका लोकविरोधी- देवेंद्र फडणवीस
नितीन राऊतांनी राजीनामा देऊन महावितरणमध्ये क्लार्कचं काम करावं- प्रविण दरेकर