“माझ्या बापाने रक्त गाळून हा पक्ष उभारला आहे; पक्षाची बदनामी कराला तर गाठ माझ्याशी आहे”

0
698

औरंगाबाद : मराठवाड्याच्या दौऱ्यावर आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या पैठणमधील कार्यकर्ता मेळाव्यात स्थानिक नेत्यांमध्ये भर कार्यक्रमात अक्षरशः राडा झाला. यावेळी हा पक्ष माझ्या बापाने रक्त गाळून उभारला आहे, पक्षाची बदनामी कराला तर गाठ माझ्याशी आहे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

राष्ट्रवादीचे पैठण विधानसभा मतदारसंघाचे पराभूत उमेदवार दत्ता गोर्डे यांनी भाषण करताना संजय वाकचौरे यांच्यावर नाव न घेता टीका केली. त्यामुळे वाकचौरे समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी करत राडा घातला.

दरम्यान, या राड्यानंतर सुप्रिया सुळे यांना दत्ता गोर्डे आणि संजय वाकचौरे यांनाच मंचावरून उतरवून थेट सभागृहाच्या बाहेर काढावं लागलं. त्यानंतर कार्यकर्त्यांनी नमतं घेत सभागृहात थंडपणा घेतला.

महत्वाच्या घडामोडी-

“वारिस पठाण यांचं वक्तव्य मुस्लिम समाजालाही मान्य नाही”

…तर पवारांची औलाद सांगणार नाही- अजित पवार

आम्ही 15 कोटी आहोत मात्र 100 कोटींना भारी आहोत; एमआयएमच्या नेत्याच वादग्रस्त वक्तव्य

…म्हणून नारायण राणेंचा जळफळाट होत आहे- विनायक राऊत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here