औरंगाबाद : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी औरंगाबदमधील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी पत्रकारांनी त्यांचं वय आणि ते राज्यभर फिरुन घेत असलेला आढावा, लातूर भूकंपावेळी पवारांनी घेतलेले निर्णय, याबाबत प्रश्न विचारलं. त्यावर शरद पवारांनी मिश्कीलपणे उत्तर दिलं.
“माझं सर्वात मोठं आणि तीव्र ऑब्जेक्शन आहे, माझं वय 80 असताना तुम्ही 85 म्हणता”, असं शरद पवार म्हणाले त्यांच्या या वाक्याने पत्रकार परिषदेत एकच हशा पिकला.
दरम्यान, मदत करणं या भावनेने मी आलो आहे. उद्या मी मुंबईला गेलो की मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन, ज्या कमतरता आहेत, त्या सांगेन. माझी खात्री आहे, मुख्यमंत्री ताबडतोब निर्णय घेतील आणि त्याच पद्धतीने एवढ्या व्यापक संकटाला तोंड देणं आवश्यक आहे, असंही शरद पवार म्हणाले.
महत्वाच्या घडामोडी-
आमच्या सगळ्यांच्या आग्रहास्तव कॅप्टन मुंबईत बसून नियंत्रण ठेवत आहेत- शरद पवार
शरद पवारांचं खाजगी डॉक्टरांना इंजेक्शन; म्हणाले…
…तर आरोग्य विभागात मुलाखतीशिवाय…; राजेश टोपेंनी केली ‘ही’ मोठी घोषणा
सरकारला देवेंद्र फडणवीस हे संताजी-धनाजीसारखे दिसतात; भाजपचं मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर