मुंबई : नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेत कंटाळले असून मातोश्रीवर विचारुनच त्यांना सर्व निर्णय घ्यावे लागतात. एकनाथ शिंदे या प्रकाराला कंटाळले असून लवकरच निर्णय होईल, असा गौप्यस्फोट केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केला होता. त्याला एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलंय.
नारायण राणे यांनी ‘जन आशीर्वाद’ यात्रा काढली आहे तर त्यांनी आपल्याला ‘जन आशीर्वाद’ कसा मिळेल हे बघावे. त्याऐवजी शिवसेनेत कोण नाराज आहेत आणि कोण कंटाळले आहेत, यावर बोलून फुकट वेळ घालू नये. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील राज्यातील सरकार भक्कम आहे व ते पाच वर्षांचा कार्यकाळ सहज पूर्ण करेल, असं एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.
हे सरकार टिकणार नाही. पाच महिन्यात पडेल. हे फुटतील, ते फुटतील अशा अनेक वावड्या भाजप नेत्यांनी उठवल्या. पण एक वीटही हलली नाही. आता नारायण राणे ‘साहेब’ काही हलते का त्याची चाचपणी करत असावे. एक सांगतो, उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व भक्कम असून एकनाथ शिंदे तर सोडाच; पण एक शिवसैनिकही कोणाला हलवता येणार नाही, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय.
मी एक निष्ठावान शिवसैनिक असून माझी निष्ठा केवळ शिवसेनेशी आहे. पक्षाने मला ज्या जबाबदाऱ्या दिल्या त्या प्रामाणिकपणे पार पाडणे हीच माझी भूमिका आहे. केवळ राजकीय स्वार्थासाठी इकडून तिकडे उड्या मारणे हे माझ्या रक्तात नाही, असा टोलाही एकनाथ शिंदेंनी यावेळी लगावला.
महत्वाच्या घडामोडी –
परमेश्वराने ठाम भूमिका घेतल्यानेच करोना आणि पूर आला; विश्वजित कदमांचं अजब वक्तव्य
“सामनाचं नाव आता पाकिस्ताननामा किंवा बाबरनामा करा”; शेलारांची संजय राऊतांवर टीका
“नारायण राणेंना ‘पब्लिसिटी स्टंट’चा मोह आवरता आला नाही”
‘या’ तालुक्यात भाजप-शिवसेना युती कायम; भाजप खासदाराची माहिती