Home महाराष्ट्र चुकीला चुकीचंच म्हटलं पाहिजे- शरद पवार

चुकीला चुकीचंच म्हटलं पाहिजे- शरद पवार

सातारा : राज्यात सत्तास्थापनेच्या पेचा अनखी वढत चालला आहे. अजित पवार यांनी बंड करून उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. या प्रकारने शरद पवार चांगलेच दुखावले आहेत. आज साताऱ्यात बोलताना चुकीला चुकीचंच म्हटलं पाहिजे, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

जगात काय चाललंय याकडे लक्ष असलं पाहिजे… चुकीला चुकीचंच म्हटलं पाहिजे, हे सगळे करत असताना मूळ धंदा व्यवस्थित करावा, असं सल्ला त्यांनी उपस्थितांना दिला.

माजी उपपंतप्रधान आणि काँग्रेसचे दिवंगत नेते  यशवंतराव चव्हाण यांचा आज स्मृतीदिन आहे. त्या निमित्ताने शरद पवार कराडमध्ये आले होते. त्यांनी प्रितीसंगम येथे यशवंतराव चव्हाणांना आदरांजली वाहिली.

दरम्यान, मी आणखी राष्ट्रवादीतच आहे आणि कायमस्वरूपी राष्ट्रवादीतच राहिल. शरद पवार हेच माझे कायमस्वरूपी नेते आहेत. भाजप आणि राष्ट्रवादी राज्याला स्थिर सरकार देईल, असं ट्वीट अजित पवार यांनी काल केलं होतं. त्यावर अजित पवार यांचे विधान खोटे, दिशाभूल करणारे आणि खोडसाळ असून समाजात चुकीचा समज पसरविणारे आहे, असं शरद पवारांनी म्हटंल होतं.