मुंबई : बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने नियमावली जारी केली आहे. मात्र, या नियमावलीवर काही मुस्लिम नेते नाराज असल्याची माहिती समोर आली होती. त्याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज बैठक बोलावली.
या बैठकीत मुस्लिम नेत्यांनी शरद पवार यांच्याकडे आपली बाजू मांडली. त्यानंतर शरद पवार यांनी बैठकीतील नेत्यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आपली बाजू मांडण्याची सूचना दिली, अशी माहिती समाजवादी पक्षाचे नेते आमदार अबू आझमी यांनी दिली आहे.
मंत्रिमंडळातील नेत्यांची नियमावली तयार करण्याची जबाबदारी असते. पण सगळे तमाशा बघत आहेत. आज सर्व मुसलमान त्रस्त आहेत. शेतकरी चिंताग्रस्त आहेत. त्यांचे बकरे पावसाच्या पाण्यात भिजत आहेत, बकऱ्यांचा मृत्यू होत आहे. या सणानिमित्ताने शेतकऱ्यांना 300 ते 400 कोटी रुपये मिळतात, असं अबू आझमी म्हणाले.
दरम्यान, शरद पवार यांचे आम्ही खूप आभारी आहोत की, त्यांनी आमची बाजू ऐकून घेतली. त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे जाण्याची सूचना दिली आहे. आम्ही सर्व मुख्यमंत्र्याकडे आमची बाजू मांडणार आहोत.
महत्वाच्या घडामोडी-
सरकारने 31 जुलैनंतर पुन्हा लॉकडाउन वाढवला तर…”, प्रकाश आंबेडकरांचा ठाकरे सरकारला इशारा
भाजपनं खरंच स्वबळावर लढून पाहावं; बाळासाहेब थोरातांचे फडणवीसांना आव्हान
“मी महाराष्ट्रापासून दूर कशी जाईन?, आपलं जे मूळ असतं तिथून आपण दूर जात नाही”
चंद्रकांत पाटलांनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या टीकेला राजेश टोपेंचं प्रत्युत्तर; म्हणाले…