बात हरामखोरीची निघाली तर…; आशिष शेलारांचा सामनावर निशाणा

0
170

मुंबई : अभिनेत्री कंगना रणाैतने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केल्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी कंगणा रणाैतला हरामखोर मुलगी असं म्हणत तिच्यावर टीकास्त्र सोडलं होतं. यावरून भाजप नेते आशिष शेलार यांनी ट्विट करत शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनावर निशाणा साधला आहे.

बात हरामखोरीची निघाली तर मग डांबराने लिहीले जाईल असे मुंबईकरांना बरेच आठवेल! 106 हुतात्म्यांना गोळ्या घालणाऱ्या काँग्रेस सोबतच सत्तेत बसलात ना? मुंबाई मातेचा अपमान कोण करतेय? बेईमानी नेमकी कोण करतेय? हुतात्म्यांचे तळतळाट तुम्हाला तर लागणार नाही ना? ऐवढे तपासून पहा, असं आशिष शेलार यांनी म्हणत सामनाला सवाल केले आहेत.

महत्वाच्या घडामोडी-

“रिया चक्रवर्तीचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला”

बाळासाहेब ठाकरेंचे हे कार्यकर्ते तुटतील पण तुमच्यासमोर वाकणार नाहीत; रोहित पवारांचा भाजपवर निशाणा

भाजपा हा भेदभाव लक्षात ठेवेल; चंद्रकांत पाटलांचं रामराजे निंबाळकरांना पत्र

“भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांना कोरोनाची लागण”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here