मुंबई : मुंबईत काल खूप मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे अनेक रेल्वेसेवा बंद होत्या. तर अनेकांच्या घरांमध्ये पाणी शिरलं. यावरून भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी शिवसेना नेते व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
मुसळधार पावसाने मुंबईला झोडपले. वस्त्यांमध्ये पाण्याचे लोट शिरले. गोरगरिबांचे संसार पुन्हा उध्वस्त झाले. महापालिकेने मुंबई तुंबवून दाखवली. पण तरीही ते घरीच. दार उघड भावा दार उघड., असं ट्विट करत अतुल भातखळकर यांनी आदित्य ठाकरेंवर टीका केली आहे.
दरम्यान, उपनगराचे पालकमंत्री आदित्य ठाकरे हे उपनगराकडे फिरकायला तयार नाहीत. पण ते रमलेत ते फक्त पर्यटन आणि ताजमहाल हाॅटेलच्या करारामध्ये, असा टोलाही अतुल भातखळकर यांनी आदित्य ठाकरेंना लगावला आहे.
मुसळधार पावसाने मुंबईला झोडपले. वस्त्यांमध्ये पाण्याचे लोट शिरले. गोरगरिबांचे संसार पुन्हा उध्वस्त झाले. महापालिकेने मुंबई तुंबवून दाखवली.
पण तरीही ते ‘घरी’च.
दार उघड भावा दार उघड…@OfficeofUT @mybmc pic.twitter.com/CrX66hauRZ— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) September 23, 2020
महत्वाच्या घडामोडी-
“अभिनेत्री निवेदिता सराफ यांना कोरोनाची लागण”
मला प्रतिवादी करण्याचा विचार हास्यास्पद; संजय राऊतांचा कंगणा रणाैतला टोला
बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यपविरोधात FIR दाखल
“शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोनाची लागण”