मुंबई : सचिन वाझे प्रकरणात अखेर मुंबई पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी याबाबतची घोषणा केलीय. परमवीर सिंग यांच्या जागी आता हेमंत नगराळे हे मुंबई पोलीस आयुक्तपदाचा कार्यभार पाहणार आहेत. सरकारच्या या निर्णयावर भाजप नेते आशिष शेलार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
एका सामान्य नागरिकाचा खून, एक एपीआयला अटक, त्याच्या गाडीत नोटांची बंडल, नोटा मोजण्याचे मशीन, गाडीत नंबर प्लेटचा खच. त्यावरून मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या. दुर्दैवाने ऐवढे मुंबई पोलीसांचे खच्चीकरण आणि बदनामी कधीच झाली नव्हती. ठाकरे सरकारचे हे पाप आहे, असं शेलार यांनी म्हटंल आहे.
एका सामान्य नागरिकाचा खून, एक एपीआयला अटक, त्याच्या गाडीत नोटांची बंडल, नोटा मोजण्याचे मशीन, गाडीत नंबर प्लेटचा खच…त्यावरून मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या..
दुर्दैवाने ऐवढे मुंबई पोलीसांचे खच्चीकरण आणि बदनामी कधीच झाली नव्हती.
ठाकरे सरकारचे हे पाप आहे!— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) March 17, 2021
सांताक्रूझच्या फॉरेन्सिक लॅबमधे पाठवण्यात आलेल्या संजय राठोड प्रकरणातील आँडिओ क्लीप तसेच मनसुख हिरेन प्रकरणातील शवविच्छेदन अहवालात छेडछाड सुरु? त्यामुळे या दोन्ही प्रकरणी स्वतंत्र यंत्रणेमार्फत या पुराव्यांची तपासणी करण्यात यावी!, असंही आशिष शेलार म्हणाले आहेत.
ठाकरे सरकारची हेराफेरी सुरुच
सांताक्रूझच्या फॉरेन्सिक लॅबमधे पाठवण्यात आलेल्या संजय राठोड प्रकरणातील आँडिओ क्लीप तसेच मनसुख हिरेन प्रकरणातील शवविच्छेदन अहवालात छेडछाड सुरु?
त्यामुळे या दोन्ही प्रकरणी स्वतंत्र यंत्रणेमार्फत या पुराव्यांची तपासणी करण्यात यावी! pic.twitter.com/6VGPqmTrWx
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) March 17, 2021
महत्वाच्या घडामोडी –
“हेमंत नगराळे मुंबईचे नवे पोलिस आयुक्त”
आशिष शेलारांचे आरोप बालिशपणाचे, त्यांची कीव येते- नाना पटोले
“मराठी फिल्म इंडस्ट्रीजमधील ‘या’ CUTEST COUPLE ला कोरोनाची लागण”