Home महाराष्ट्र मुंबई महापालिकेचा कोविड लस घोटाळा; किरीट सोमय्यांचा आरोप

मुंबई महापालिकेचा कोविड लस घोटाळा; किरीट सोमय्यांचा आरोप

मुंबई : राज्यात कोरोना लसींचा तुठवडा जाणवत आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेनं कोरोना लसींसाठी ग्लोबल टेंडर काढलं. यामध्ये निविदा भरण्यासाठी काल शेवटचा दिवस होता. यात सुरुवातीला फक्त 3 टेंडर आले होते. पण शेवटच्या एका तासात 5 टेंडर आले. यावर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी प्रतिक्रिया देत ठाकरेव सरकारवर निशाणा साधला आहे.

मुंबई महापालिकेचा कोविड लस घोटाळा! काल टेंडरची मुदत संपत होती, तर एका तासात 5 टेंडर आले! हे 5 टेंडर बोगस आहेत, कोणतेही डॉक्युमेंटेशन नाही, तेच डॉक्युमेंट्स जोडण्यासाठी आता 8 दिवसांची मुदत वाढवली गेली. गेल्या महिन्यात मुंबई महानगरपालिका-ठाकरे सरकारने रेमडेसीवीर घोटाळा केला होता, असं किरीट सोमय्या यांनी सरकारवर आरोप केला आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“लशीची जागतिक निविदा देखील टक्केवारीच्या घोळात अडकली आहे का?”

कोकणाच्या नागरिकांसाठी दिलासादायक बातमी! ताैक्ते चक्रीवादळग्रस्तांसाठी 250 कोटींची मदत- विजय वडेट्टीवार

“आजोबांनी आयपीएल आणून चीअरलीडर्स नाचवल्या, नातू कोविड सेंटर मध्ये नाचतो”

भाजपने पनवती म्हणून नारायण राणेंना अडगळीत टाकलंय, म्हणून ते अजून कोकणातही गेलेले नाहीत”