दुबई : आजचा आयपीएलच्या मुंबई इंडियन्स विरूद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळल्या गेलेल्या क्वालिफायर-1 सामन्यात मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सचा 57 धावांनी पराभव केला.
दिल्ली कॅपिटल्सने टाॅस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 5 गडी गमावत 200 धावा केल्या. मुंबईकडून ईशान किशनने 30 चेंडूत नाबाद 55 धावा, सुर्यकुमार यादवने 38 चेंडूत 51 धावा, क्विंटन डीकाॅकने 25 चेंडूत 40 धावा, तर हार्दिक पांड्याने 14 चेंडूत नाबाद 37 धावांची आक्रमक खेळी केली. तर दिल्लीकडून रविचंद्रन अश्निनने 3, तर नाॅर्त्झ, मार्कस स्टाॅयनिसने प्रत्येकी 1 विकेट घेतली.
धावांचा पाठलाग करताना दिल्लीचा संघ 20 षटकात 8 गडी गमावत 143 धावाच करू शकला. दिल्लीकडून मार्कस स्टाॅयनिसने 46 चेंडूत 65 धावा केल्या, तर अक्षर पटेलने 33 चेंडूत 42 धावा केल्या. मुंबईकडून बुम-बूमराने 4 विकेट, ट्रेंट बोल्टने 2, तर कृणाल पांड्या व कायरान पोलार्डने प्रत्येकी 1 विकेट घेतली.
महत्वाच्या घडामोडी-
भाजप म्हणजे उसात शिरलेला हत्ती- सतेज पाटील
दिवाळीच्या तोंडावर ठाकरे सरकारचा शेतकऱ्यांना दिलासा; येत्या सोमवारपासून थेट खात्यात पैसे जमा होणार
Qualifier-1: दिल्ली कॅपिटल्सने टाॅस जिंकला; प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय
गोव्यात न्यूड फोटो शूट केल्याप्रकरणी मॉडेल पूनम पांडेला अटक