मुंबई : आजच्या मुंबई इंडियन्स विरूद्ध कोलकाता नाईट रायडर्सच्या या सामन्यात मुंबई इंडियन्सने कोलकाता नाईट रायडर्सचा 49 धावांनी पराभव केला.
कोलकाताचा कर्णधार दिनेश कार्तिकने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 5 विकेट गमावत 195 धावा केल्या. मुंबईकडून कर्णधार रोहित शर्माने 54 चेंडूत 80 धावा केल्या. ज्यात त्याने 3 चाैकार व 6 षटकार मारले तर सुर्यकूमार यादवने 28 चेंडूत 47 धावा केल्या. यात 6 चाैकार व 1 षटकाराचा समावेश होता. कोलकाताकडून शिवम मावीने 2 विकेट्स घेतल्या. तर आंद्रे रसेल व सुनिल नारायणने प्रत्येकी 1 विकेट घेतली.
धावांचा पाठलाग करताना कोलकाताची सुरूवात चांगली नाही झाली. त्यांच्या पहिल्या 2 विकेट्स केवळ 25 धावांत आऊट झाल्या. त्यानंतर कर्णधार दिनेश कार्तिक व नितीश राणा यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. दोघांनी 10 षटकात स्कोअर 71 वर नेला. 11 व्या षटकात दिनेश कार्तिक आऊट झाला. कार्तिकने 23 चेंडूत 30 धावा केल्या. ज्यात त्याने 5 चाैकार लगावले. पुढच्याच षटकात राणाही आऊट झाला. राणाने 18 चेंडूत 24 धावा केल्या. ज्यात 2 चाैकार व 1 षटकाराचा समावेश होता. त्यानंतर आलेला आंद्रे रसेल फारशी चमक दाखवू शकला नाही. तो केवळ 11 धावांवर आऊट झाला आणि त्याच षटकात माॅर्गनही आऊट झाला आणि कोलकाताच्या आशा संपुष्टात आल्या. कोलकाताकडून पॅट कमिंसने सर्वाधिक 33 धावा केल्या. त्याने 12 चेंडूचा सामना करताना 1 चाैकार व 4 षटकार मारले. कोलकाताचा 20 षटकात 146 धावाच करू शकली.
दरम्यान, मुंबईकडून ट्रेंट बोल्ट, जेम्स पॅटिन्सन व जसप्रित बुमराने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तर पोलार्डने 1 राहूल चहरने 2 विकेट घेतली.
महत्वाच्या घडामोडी-
रोहित शर्मा आणि सुर्यकुमार यादवची दमदार फलंदाजी; मुंबईचे कोलकाता समोर 196 धावांचे लक्ष्य
कलानगरचे पाणी ओसरते मग मुंबईचे का नाही?; आशिष शेलारांचा राज्य सरकारला सवाल
मुंबईकर पुरात बुडले आणि पालकमंत्री पर्यटनात रमले; अतुल भातखळकरांचा आदित्य ठाकरेंना टोला
“अभिनेत्री निवेदिता सराफ यांना कोरोनाची लागण”