दुबई : आजच्या आयपीएलच्या फायनल मुंबई इंडियन्स विरूद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सचा 5 विकेट्सने पराभव केला.
या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाचा कर्णधार श्रेयस अय्यरने टाॅस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 7 गडी गमावत 156 धावा केल्या. दिल्लीकडून कर्णधार श्रेयस अय्यरने 50 चेंडूत 65 धावांची खेळी केली. तर रिषभ पंतने 38 चेंडूत 56 धावांची वेगवान खेळी केली. मुंबईकडून ट्रेंट बोल्टने 3, नॅथन कुल्टर नाईलने 2, तर जयंत यादवने 1 विकेट घेतली.
धावांचा पाठलाग करताना मुंबईने हे लक्ष्य 18.4 षटकात 5 गडी गमावत पूर्ण केले. मुंबईकडून कर्णधार रोहित शर्माने 51 चेंडूत 68 धावांची खेळी केली. तर ईशान किशनने 19 चेंडूत नाबाद 33 धावांची वेगवान खेळी करत मुंबईला विजय मिळवून देण्यात महत्वाचे याेगदान दिले.
महत्वाच्या घडामोडी-
“शिवसेनेनं काँग्रेसला सल्ला देण्याऐवजी स्वतःचं तोंड बंद ठेवावं”
देवेंद्र फडणवीसांमुळेच बिहारमध्ये चमत्कार झाला- शरद पवार
संजय राऊतांचा गजनी झालाय ते पराभव विसरतात- निलेश राणे