आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
दुबई : टी 20 विश्वचषक 2021 स्पर्धेत आज अफगाणिस्तान विरूद्ध स्काॅटलंड यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यात अफगाणिस्तानने स्काॅटलंडचा 130 धावांनी दारूण पराभव केला.
अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 4 विकेट गमावत 190 धावांचा डोंगर उभा केला. अफगाणिस्तानकडून एन.झादरानने 34 चेंडूत 59 धावांची विस्फोटक खेळी केली. तर हजरतुल्लाह झाझईने 30 चेंडून 44, गुरबाजने 37 चेंडूत 46, तर मोहम्मद शेहजादने 15 चेंडूत 22 धावा केल्या. स्काॅटलंडकडून शफयान शरीफने 2, तर डेव्ही व वॅटने प्रत्येकी 1 विकेट घेतली.
हे ही वाचा : हिम्मत असेल तर समीर वानखेडेंवर कारवाई करुन दाखवा; नितेश राणेंचा इशारा
दरम्यान, धावांचा पाठलाग करताना स्काॅटलंडचा संघ मात्र 10.2 षटकात केवळ 61 धावांवर आटोपला. स्काॅटलंडकडून जाॅर्ज मुनसेने सर्वाधिक 18 चेंडूत 25 धावांची खेळी केली. अफगाणिस्तानकडून मुजीब रेहमानने 4 षटकात केवळ 20 धावा देत 5 विकेट बाद केले. तर राशिद खानने 2.2 षटकात केवळ 9 धावा देत 4 गडी बाद केले.
महत्वाच्या घडामोडी –
नानाभाऊ पटोलेच आता निवडून येणार; औरंगाबादच्या ‘या’ लोकगायिकानं गाण्यातून व्यक्त केल्या भावना
समीर वानखेडेंच्या अडचणी वाढणार; दिलीप वळसे पाटलांकडून संकेत
“Breaking News! भारत-पाक सामन्यानंतर हार्दिक पांड्याच्या प्रकृतीत बिघाड, रूग्णालयात केलं दाखल”