“राज्यपाल महोदय 8 वा महिना लागला, निर्णयाचा पाळणा नक्की कितव्या महिन्यात हलणार?”

0
445

मुंबई : विधान परिषदेतील राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या मुद्द्यावरुन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावर निशाणा साधला आहे.

सरकारने 12 नावांची शिफारस करुन आता आठवा महिना लागला. राज्यपालांच्या निर्णयाचा पाळणा नक्की कितव्या महिन्यात हलणार आहे? हे राजभवनातील सुईणीने एकदा स्पष्ट करावं, असा टोला संजय राऊतांनी यावेळी लगावला.

दरम्यान, राज्यपालांनी घटनेची चौकट मोडली तर त्यांची इज्जत राहणार नाही आणि त्यांच्या इज्जतीशी सध्या त्यांचेच लोक खेळ करीत आहेत. 12 आमदारांच्या नियुक्त्या रखडवून भाजप आणि राज्यपाल स्वतःचंच हसे करून घेत आहेत. हा त्यांचा रडीचा डाव आहे व वैफल्याचे झटके आहेत., अशी टीकाही संजय राऊतांनी यावेळी केली.

महत्वाच्या घडामोडी –

कोरोना काळात लसी दुसऱ्या देशांना पाठवणं, हे हत्याकांडच, मोदींनी माफी मागावी- नाना पटोले

“नारायण राणेंसारख्या विश्वासघातकी माणसाला बाळासाहेबांच्या स्मृती स्थळाला भेट देण्याचा नैतिक अधिकार नाही”

आमचं तीन पक्षाचं सरकार ‘अमर,अकबर,अँथनी’ प्रमाणे हिट होणार; नाना पटोलेंचं दानवेंना प्रत्युत्तर

राज्यातील अफगाणिस्तानच्या विद्यार्थ्यांची भावना केंद्रापर्यंत पोहचवणार- आदित्य ठाकरे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here