मुंबई : पुण्यात शिक्षण घेत असलेल्या 22 वर्षीय पूजा चव्हाण या तरुणीने रविवारी पुण्यातील महम्मदवाडी परिसरातील हेवन पार्क सोसायटीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली होती, त्या आत्महत्येस महाविकास आघाडी सरकारमधील विदर्भातील एका मंत्र्याचा समावेश असल्याची चर्चा सुरू आहे. यावर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
गृहमंत्री जीं सध्या राज्यातील महिला अत्याचारावबाबत”संजय”ची म्हणजेच जे जे दिसेल ते ते पहावे ते साथी सत्ताधार्यांना कथन करत क्लीनचीट देत पुढे चालावे च्या भुमिकेत दिसताहेत. पूजा राठोड केस मध्ये मोबाईल च मोठा पुरावा आहे संभाषण क्लीप्स मिळाल्या आहेत, असं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे.
गृहमंत्री जीं सध्या राज्यातील महिला अत्याचारावबाबत”संजय”ची म्हणजेच जे जे दिसेल ते ते पहावे ते साथी सत्ताधार्यांना कथन करत क्लीनचीट देत पुढे चालावे च्या भुमिकेत दिसताहेत
पूजा राठोड केस मध्ये मोबाईल च मोठा पुरावा आहे संभाषण क्लीप्स मिळाल्या आहेत (3/3)
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) February 12, 2021
ज्यात तिला आत्महत्येस परावृत्त करण्यापासून तर आत्महत्या झाल्यानंतर कसही करून तिचा मोबाईल ताब्यात घेण्यापर्यंतच्या सुचना कथित मंत्र्याकडून कुणा अरूण ला होतांना सगळ्यांनी ऐकल्या अजूनही याबद्दल पोलिस काहीही स्पष्टता देत नाही, असंही चित्रा वाघ म्हणाल्या.
पूजा चव्हाणच्या परीवारावर दबाव असू शकेल पोलिस अशा केसेस स्यु-मोटो दाखल करून घेऊ शकतात हे मी आपल्याला सांगायला नकोचं अर्थात त्यासाठी राजकीय इच्छाशक्ती महत्वाची आहे. मुख्यमंत्री महोदय एव्हढे पुरावे असतांना मुसक्या आवळायच्या सोडून कसली वाट पहाताय, असं ट्विट करत चित्रा वाघ यांनी सरकारला सवाल केलाय.
पूजा राठोड च्या परीवारावर दबाव असू शकेल पोलिस अशा केसेस स्यु-मोटो दाखल करून घेऊ शकतात हे मी आपल्याला सांगायला नकोचं अर्थात त्यासाठी राजकीय इच्छाशक्ती महत्वाची आहे
मुख्यमंत्री महोदय
एव्हढे पुरावे असतांना मुसक्या आवळायच्या सोडून कसली वाट पहाताय (३/३) @CMOMaharashtra @MahaPolice— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) February 12, 2021
महत्वाच्या घडामोडी
…यापुढे काँग्रेसच महाराष्ट्रात सत्तेत राहणार; नाना पटोलेंचं मोठं विधान
16 फेब्रुवारीपासून पेंग्विन पहायला याचचं हं! पण खबरदार जर…; आशिष शेलारांचा सरकारवर हल्लाबोल
दुसऱ्या कसोटीसाठी इंग्लंडचा संघ जाहीर; अँडरसनसह 4 खेळाडू संघाबाहेर
“राज्यपालांसारखाच मंत्रिमंडळालाही मान, एका हाताने टाळी वाजत नाही”