मिस्टर 360 ए.बी.डिव्हीलियर्सचे नाबाद अर्धशतक; आरसीबीची राजस्थानवर 7 विकेट्सनी मात

0
186

दुबई : आजच्या राॅयल चैलेंजर्स बेंगलोर विरूद्ध राजस्थान राॅयल्स यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यात राॅयल चैलेंजर्स बेंगलोरने राजस्थान राॅयल्स 7 विकेट्सने पराभव केला.

राजस्थानने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 6 गडी गमावत 177 धावा केल्या. राजस्थानकडून कर्णधार स्टिव्ह स्मिथने 36 चेंडूत 57 धावा केल्या. तर राॅबिन उथप्पाने 22 चेंडूत 41 धावा केल्या. तर बेंगलोरकडून ख्रिस माॅरिसने 4, तर युझवेंद्र चहलने 2 विकेट घेतल्या.

धावांचा पाठलाग करताना राॅयल चैलेंजर्स बेंगलोरने हे आव्हान 3 विकेट्स गमावत 19.4 षटकात पूर्ण केले. एक वेळ बेंगलोरला 18 चेंडूत 45 धावांची गरज होती. मात्र ए.बी.डिव्हीलियर्सने 360 स्टाईलमध्ये राजस्थान गोलंदाजांची धुलाई करत बेंगलोरला विजय मिऴवून दिला. बेंगलोरकडून ए.बी.डिव्हीलियर्सने 22 चेंडूत 55 धावा, तर विराट कोहलीने 32 चेंडूत 43 धावा केल्या. राजस्थानकडून श्रेयस गोपाल, कार्तिक त्यागी व राहूल टेवाटियाने प्रत्येकी 1 विकेट घेतली.

महत्वाच्या घडामोडी-

पूरस्थितीबाबत पंतप्रधान मोदी मुख्यमंत्र्यांशी बोलले; मराठीत ट्विट करत दिली माहिती

“पक्षांतराच्या चर्चांवर एकनाथ खडसेंचा मोठा खुलासा”; म्हणाले…

क्विंटन डिकाॅकचे नाबाद अर्धशतक; मुंबईचा कोलकातावर एकतर्फी विजय

ओला दुष्काळ जाहीर करा; देवेंद्र फडणवीसांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here