नवी दिल्ली : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज राजधानी दिल्लीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेतली. स्वत: संजय राऊत यांनी या भेटीची माहिती ट्विटरद्वारे दिली आहे.
‘राहूल गांधी यांच्याशी आज भेट झाली. गांधी यांच्याशी महाराष्ट्र तसेच राष्ट्रीय राजकारणावर सविस्तर चर्चा झाली. राज्य सरकारच्या कामा विषयी त्यांनी समाधान व्यक्त केले. शिवसेनेची जडणघडण तसेच कार्यपद्धती बाबत त्यांनी जाणून घेतले’, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली आहे.
दरम्यान, राज्यात महाविकास आघाडी सरकार आपल्या ओझ्यानं कोसळेल असा दावा भाजप नेत्यांकडून सातत्यानं केला जात आहे. मात्र, हे सरकार 5 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करेल, असा दावा संजय राऊत ठामपणे करताना पाहायला मिळतात. या पार्श्वभूमीवर ते काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या भेटीगाठी घेत असल्याचं पाहायला मिळत आहे.
श्री. राहूल गांधी यांच्याशी आज भेट झाली. गांधी यांच्याशी महाराष्ट्र तसेच राष्ट्रीय राजकारणावर सविस्तर चर्चा झाली. राज्य सरकारच्या कामा विषयी त्यांनी समाधान व्यक्त केले. शिवसेनेची जडणघडण तसेच कार्यपद्धती बाबत त्यांनी
जाणून घेतले.— Sanjay Raut (@rautsanjay61) August 2, 2021
महत्वाच्या घडामोडी –
“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे-संभाजी भिडे यांची बैठक, बंददाराआड झाली चर्चा”
“अनलाॅकबाबत मुख्यमंत्र्यांकडून नवी नियमावली जारी; वाचा काय सुरू, काय बंद?”
“संजय राठोडांविरोधात पुरावा?; चित्रा वाघ म्हणाल्या….”
“MPSC चा ‘तो’ विषय आता सरकारकडे नाही तर राज्यापालांकडे प्रलंबित”