“खासदार संजय राऊत यांनी घेतली काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची भेट, तर्कवितर्कांना उधाण”

0
418

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

नवी दिल्ली : आगामी काळात देशात 5 राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. यावरून सर्वच राजकीय पक्षांनी आपली कंबर जोरदार कसली आहे. अशातच आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज दिल्लीत काॅंग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांची भेट घेतली. त्यामुळे अनेक तर्क वितर्कांना उधाण आलं आहे.

हे ही वाचा : गरम असलेल्या शशिकांत शिंदेंना थंड करुन घरी बसवणार; शिवेंद्रराजे भडकले

शिवसेना सध्या महाराष्ट्राबाहेर आपली राजकीय शक्ती वाढवण्याची शक्यता आहे. परिणामी शिवसेना गोवा आणि उत्तर प्रदेशात आपली ताकद आजमावताना दिसणार आहे., याच पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी प्रियांका गांधी यांची भेट घेतली असल्याचं समोर येत आहे.

दरम्यान, संजय राऊत आणि प्रियांका गांधी यांनी आजच्या भेटीत युपी आणि गोवा राज्याच्या विधानसभा निवडणुकीवर चर्चा केली. तसेच आमच्यातील चर्चा सकारात्मक झाल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

शिवसेनेकडून भाजपला मोठा धक्का; वर्ध्यातील भाजप पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश

मोदी सरकारने ओबीसी बांधवांच्या पाठीत खंजीर खुपसला; राष्ट्रवादीचा आरोप

“पवार साहेबांनी नेमला शिवसेनेचा नवीन कामगार प्रमुख”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here