आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याविरोधात गंभीर आरोप केले आहेत. संजय राऊत यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी सोमय्या पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात जात होते. मात्र पालिकेच्या पायऱ्यांवरच शिवसैनिकांनी निदर्शने करत त्यांचा रस्ता अडवला. त्यामुळे झालेल्या गोंधळात त्यांना धक्काबुक्कीही झाली. त्यामुळे सोमय्या खाली पडले.
सुरक्षारक्षकांनी प्रसंगावधान राखून तातडीने सोमय्या यांना गाडीत बसविले. सोमय्या यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यावरून आता भाजप खासदार रक्षा खडसे यांनी प्रतिक्रिया देत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.
हे ही वाचा : “शिवसेना-राष्ट्रवादीला मनसे दणका देणार; राज ठाकरेंकडे मागितली आघाडीची परवानगी”
महाराष्ट्रात सध्या अत्यंत चुकीचं राजकारण सुरू आहे. एखाद्या आरटीआय कार्यकर्त्याला भ्रष्टाचाराची माहिती काढणे हा अधिकार आहे. मात्र, किरीट सोमय्या यांना पुण्यामध्ये ज्याप्रकारे खाली पाडून खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला गेला ते चुकीचं आहे. मुख्यमंत्री महाराष्ट्राचे नेते आहेत आणि त्यांचे कार्यकर्ते जर अशा प्रकारे कृत्य करत असतील तर ते योग्य नाही. मुख्यमंत्र्यांचे कार्यकर्तेही राज्यात दादागिरी दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. हे मुळीच खपवून घेतलं जाणार नाही, अशा इशारा रक्षा खडसे यांनी मुख्यमंत्र्यांना यावेळी दिला. त्या पत्रकार परिषदेत बोलत होत्या.
महत्वाच्या घडामोडी –
‘बापलेकीचं नातं कसं असावं? तर असं आसावं; …या गोष्टीमुळे मोदीही सुप्रिया-पवारांकडे बघत राहिले
देवेंद्र फडणवीसांनी दिली मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकरांना लिफ्ट; चर्चांना उधाण
“पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या डोळ्यात डोळे घालून आदित्य ठाकरेंनी साधला संवाद, राजकीय चर्चांना उधाण”