खासदार धैर्यशील माने यांनी पुरवला लेकीचा बालहट्ट; संसदेतील सर्व नेत्यांशी घडवून आणली भेट

0
438

नवी दिल्ली : हातकणंगल्याचे खासदार धैर्यशील माने यांनी आपल्या लाडक्या लेकीचा हट्ट पुरवला. दिल्लीतील नेत्यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करण्याचा हट्ट धैर्यशील माने यांची कन्या आदिश्री धैर्यशील माने हिने केला होता.

धैर्यशील माने यांनी संसद भवनातील सेंट्रल हॉलमध्ये अनेक नेत्यांबरोबर आदिश्रीची भेट घडवून आणली. यावेळी आदिश्रीने संसद भवनातील सर्व नेत्यांशी संवाद साधला आणि सर्वांची मने देखील जिंकली.

आदिश्री हिने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यासहीत अनेक वरिष्ठ नेत्यांशी संवाद साधला.

दरम्यान, स्मृती इरानी यांनी मोठेपणी तू काय होणार असा प्रश्न विचारल्यावर आदिश्री ने बांबासारखं खासदार व्हायचं आहे, असं उत्तर दिलं.

महत्वाच्या घडामोडी-

-बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाची जागा निश्चित; ‘या’ ठीकाणी उभा राहणार स्मारक

-माझ्या मते जाहीर झालेलं खातेवाटप हे तात्पुरत्या स्वरुपाचे – जयंत पाटील

-मुख्यमंत्र्यांनी दिली परवानगी.. पालिकेमार्फत लवकरच स्वतंत्र वीजनिर्मिती सुरु होणार!

-“रोज उठून पक्षाविरोधात कारवाई करत असाल तर कोणतीही गय केली जाणार नाही”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here