मुंबई : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर केला. यावर शिवसेना नेते व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते टी.व्ही.9 मराठीशी बोलत होते.
देशातील काही राज्यांमध्ये निवडणुका होत आहेत. त्या राज्यांना अर्थसंकल्पात बरंच गिफ्ट मिळालं आहे. पण यातून महाराष्ट्र आणि मुंबईला काय मिळालं हे शोधावं लागेल, असं आदित्य ठाकरे म्हणाले.
कोरोना कालावधीत कोव्हिडसाठी केंद्र सरकारने 20 लाख कोटींचं पॅकेज जाहीर केलं होतं. त्या पॅकेजचं काय झालं? असा प्रश्न यावेळी आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला. तसेच जे बजेट जाहीर झालं ते या राज्यांना कसं मिळणार? हे सरकारनं जाहीर करावं, असंही आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, सर्वात जास्त रोजगार निर्मिती सध्या पर्यटन क्षेत्रात होऊ शकते. त्यामुळे पर्यटनावर भर देणं अपेक्षित होतं. पण बजेटमध्ये त्यावर काहीच तरतूद केलेली दिसत नाही, असा मुद्दाही आदित्य ठाकरेेंनी यावेळी उपस्थित केला.
महत्वाच्या घडामोडी-
“केंद्रीय अर्थसंकल्पानं देशातील जनतेला पुन्हा एकदा मरणाच्या वाटेवर नेऊन ठेवलंय”
…तर बंगळुरवर देखील आमचा अधिकार; जयंत पाटलांचं कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर
शरद पवारांवर टीका केल्याशिवाय आमचा पक्ष वाढूच शकत नाही- चंद्रकांत पाटील
“PF संदर्भात निर्मला सीतारमण यांनी केली ‘ही’ मोठी घोषणा”