Home महाराष्ट्र मोदींच्या विकासाची गाडी रिव्हर्स गियरमध्ये, आणि त्या गाडीचे ब्रेक देखील फेल- राहुल...

मोदींच्या विकासाची गाडी रिव्हर्स गियरमध्ये, आणि त्या गाडीचे ब्रेक देखील फेल- राहुल गांधी

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : केंद्र सरकारने दिवाळी निमित्त देशातील नागरिकांना मोठी भेट दिली आहे. केंद्र सरकारने बुधवारी पेट्रोलमध्ये 5 रूपयांची तर डिझेलच्या दरात 10 रुपयांची उत्पादन शुल्कात कपात केली आहे. यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी प्रतिक्रिया देत मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

हे ही वाचा : “अहमदनगर जिल्हा रूग्णालयात अग्नितांडव; अतिदक्षता विभागातील 10 रूग्णांचा मृत्यू”

राहुल यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ट्विट केलं आहे. यामध्ये एका सर्वेक्षणाचे वृत्त असून त्यानुसार, घरगुती सिलेंडरच्या किमती वाढल्यामुळे तब्बल 42 टक्के लोकांनी गॅसचा वापर करणे बंद केल्याचे समोर आले आहे. या लोकांनी पुन्हा एकदा लाकडी इंधनाचा वापर करून चुलीवर स्वयंपाक करायला सुरुवात केल्याचा निष्कर्ष या सर्वेक्षणातून समोर आला आहे.

विकासाच्या आश्वासनांपासून कित्येक मैल दूर असलेल्या लाखो परिवारांवर पुन्हा चूल फुंकण्याची वेळ ओढवली आहे. मोदीजींच्या विकासाची गाडी रिवर्स गियरमध्ये आहे आणि त्या गाडीचे ब्रेक देखील फेल आहेत, असं म्हणत राहुल गांधींनी मोदी सरकारवर टीका केली आहे.

महत्वाच्या घडामोडी – 

नरेंद्र मोदी यांना हरवणं शिवसेना किंवा शरद पवारांचं काम नाही- रामदास आठवले

“मनसेकडून शिवसेनेला टाळी, शिवसेनेच्या आवाहनाला मनसेचं समर्थन”

समीर वानखेडे यांना आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातून हटवलं; नवाब मलिकांचं सूचक वक्तव्य, म्हणाले…