मोदीजी सर्जिकल स्ट्राइक करा; माझ्या शहीद पतीचे बलिदान व्यर्थ जायला नको

0
134

पाटणा : चिनी सैनिकांसोबत सोमवारी रात्री गलवाण खोऱ्यात झालेल्या संघर्षामध्ये भारताचे 20 सैनिक शहीद झाले. शहीदांपैकी पाच जवान बिहारमधील होते. पाटणा जिल्ह्यातील बिहटामध्ये राहणाऱ्या सुनील कुमार यांनीही देशासाठी बलिदान दिले. यावेळी सुनील कुमार यांच्या वीरपत्नीने यावर आपल्या भावना व्यक्त केल्या.

पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, आपण प्रत्येक जवानाच्या प्राणाच्या बदल्यात 100-100 चीनी सैनिकांना ठार मारा, माझ्या शहीद पतीचे बलिदान व्यर्थ जायला नको, चीनवर सर्जिकल स्ट्राइक करा, अशा भावना शहीद सुनील कुमार यांच्या वीरपत्नीने व्यक्त केल्या.

दरम्यान, बिहटाच्या तारापूर गावात शहीद सुनील कुमार यांचे पार्थिव पोहोचले, तेव्हा संपूर्ण गाव त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी जमा झालं. यावेळी दु:ख, राग आणि अभिमानाची भावना दिसली.

महत्वाच्या घडामोडी-

अपारंपारिक ऊर्जा धोरणाला चालना देण्यासाठी अजित पवारांच्या अध्यक्षतेखालील बैठक; घेतला ‘हा’ मोठा निर्णय

भारतीय कंपनीला डावलून चिनी कंपनीला दिलेलं कॉन्ट्रॅक्ट रद्द करा- जितेंद्र आव्हाड

सुशांत तू खूप लवकर निघून गेलास; शेन वॉटसनही गहिवरला

चीनला जर युद्धाची खुमखुमी असेल तर….; रामदास आठवलेंचा इशारा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here