“मोदींनी शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले, आंदोलनात राजकारण येऊ नये”

0
343

मुंबई : राजधानी दिल्लीत सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी हजारोंच्या संख्येने महाराष्ट्रातील शेतकरी मुंबईच्या आझाद मैदानात दाखल झाले आहेत. अखिल भारतीय किसान सभेचा मोर्चा काल रात्री मुंबईत दाखल झाला आहे. ते आज राजभवनावर धडकणार आहेत. या मोर्चाला आघाडीतील नेत्यांनी पाठींबा दिला आहे. यावर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी पाठिंबा दिला आहे.

केंद्र सरकार हे शेतकऱ्यांचंच सरकार आहे. शेतकऱ्यांच्या हिताचेच निर्णय पंतप्रधान मोदींनी घेतले आहेत आणि आताही सरकार शेतकऱ्यांशी चर्चेची तयारी दाखवत आहे, असं पंकजा मुंडे म्हणाल्या. तसेच शेतकरी बाजूला न राहता या आंदोलनात राजकारण येऊ नये, हा प्रयत्न सर्वांचाच असायला पाहिजे, असंही पंकजा मुंडे म्हणाल्या.

दरम्यान, सरकार सकारात्मक चर्चेसाठी तयार आहे. दोन्ही बाजूंनी सकारात्मक चर्चा झाल्यास नक्कीच तोडगा निघणार असल्याचं पंकजा मुंडे म्हणाल्या.

महत्वाच्या घडामोडी-

नशिबाने उपमुख्यमंत्रीपद मिळालं आहे हे अजित पवारांनी विसरू नये- निलेश राणे

शेतकऱ्यांच्या मोर्चाला परवानगी नाही, राजभवनावर जायचा प्रयत्न केल्यास आम्ही त्यांना रोखू- विश्वास नांगरे पाटील

निर्वस्त्र न करता छातीला स्पर्श करणे म्हणजे लैंगिक अत्याचार नव्हे- उच्च न्यायालय

राडा आणि धिंगाणा होणारच कारण…; अतुल भातखळकरांची राष्ट्रवादीवर टीका

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here