Home महाराष्ट्र कोरोना काळात लसी दुसऱ्या देशांना पाठवणं, हे हत्याकांडच, मोदींनी माफी मागावी- नाना...

कोरोना काळात लसी दुसऱ्या देशांना पाठवणं, हे हत्याकांडच, मोदींनी माफी मागावी- नाना पटोले

बुलढाणा : कोरोना व्हायरसनं राज्यात थैमान घातलं आहे. कोरोनाच्या या भयानक संकटात अनेकांनी आपले प्राणही गमावले. यावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला.

कोरोनाच्या काळात ज्यांचे मृत्यू झाले त्यांची जाहीर माफी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागावी, अशी मागणी नाना पटोले यांनी यावेळी केली. कोरोनाच्या काळात एका एका कुटुंबातील अनेक लोकांचे जीव गेले. यामुळे पंतप्रधानांनी देशाची जाहीर मागावी, असं नाना पटोले यांनी यावेळी म्हटलं.

दरम्यान, लसी दुसऱ्या देशांना पाठवून भाजपने कोरोना काळात हत्याकांड घडविलं. हे जे कृत्य झालं ते म्हणजे जालियनवाला हत्याकांड प्रमाणं झालं आहे. यासाठी केंद्राची चुकी झाली आहे., असंही नाना पटोलेंनी यावेळी म्हटलं. तसेच हे हत्याकांड घडवण्याचं पाप केंद्राने केले आहे, असा आरोपही नाना पटोलेंनी यावेळी केला.

महत्वाच्या घडामोडी –

“नारायण राणेंसारख्या विश्वासघातकी माणसाला बाळासाहेबांच्या स्मृती स्थळाला भेट देण्याचा नैतिक अधिकार नाही”

आमचं तीन पक्षाचं सरकार ‘अमर,अकबर,अँथनी’ प्रमाणे हिट होणार; नाना पटोलेंचं दानवेंना प्रत्युत्तर

राज्यातील अफगाणिस्तानच्या विद्यार्थ्यांची भावना केंद्रापर्यंत पोहचवणार- आदित्य ठाकरे

…पण राज्य सरकारने ओबीसी समाजाचे हात बांधले; चंद्रशेखर बावनकुळेंचे पवारांना प्रत्युत्तर