Home महाराष्ट्र चंद्रकांत पाटल्यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर सचिन सावंताची टीका; म्हणाले…

चंद्रकांत पाटल्यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर सचिन सावंताची टीका; म्हणाले…

मुंबई :  मराठा आरक्षण हा राज्याचा विषय आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाटते. त्यामुळेच पंतप्रधान मोदी यांची आजपर्यंत छत्रपती संभाजीराजेंशी भेट होऊ शकली नाही, असं वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं. त्यावरुन काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी चंद्रकांत पाटलांवर निशाणा साधलाय.

“मनकवड्या चंद्रकांत पाटील यांनी तीन गोष्टी स्पष्ट केल्या आहेत. 1 मोदींची विषयांची समज फार कमी आहे. 2 मोदींना मराठा आरक्षण हा विषय समजलाच नाही. 3 छत्रपती संभाजीराजे यांच्या नावातील छत्रपती या उपाधीची केवळ निवडणुकीत वापरण्याइतपतच मोदींच्या लेखी किंमत आहे”, असं सचिन सावंत यांनी चंद्रकांत पाटील म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

राजीनामा देऊन मराठा आरक्षणाचा प्रश्न मिटणार असेल तर मी आताच खासदारकीचा राजीनामा देईन- संभाजीराजे

“पंतप्रधान मोदींना वाटतं मराठा आरक्षण हा राज्याचा विषय, म्हणून ते संभाजीराजेंना भेटले नाहीत”

“मुंबई उपनगरात आदित्य ठाकरेंना दाखवा, 18 ते 44 वयोगटातील लसीकरण फुकट मिळवा”

महाराष्ट्राचे उद्धव ठाकरेच बेस्ट CM! कोरोनाची दुसरी लाट यशस्वी हाताळणारे मुख्यमंत्री म्हणून मिळाली पसंती