Home महाराष्ट्र मोदी साहेब आपण पंतप्रधान आहात की एव्हेंट मॅनेजर- रुपाली चाकणकर

मोदी साहेब आपण पंतप्रधान आहात की एव्हेंट मॅनेजर- रुपाली चाकणकर

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सकाळी देशाविसायांना संबोधित करताना 5 एप्रिल रोजी रात्री नऊ वाजून नऊ मिनिटांसाठी घरातील सर्व लाइट्स बंद करुन दिवा, मेणबत्ती, मोबाईल टॉर्च किंवा बॅटरी लावण्याचं आवाहन केलं आहे. यावरुन मोदी साहेब आपण पंतप्रधान आहात की एव्हेंट मॅनेजर आहात?, असं म्हणत राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.

जनतेच्या वेदना त्यांची आर्थिक चिंता,कोरोना विषाणू सारखे भयंकर संकट दुर कसे होईल यावर पंतप्रधान महोदय काहीच बोलत नाहीत.वैद्यकीय उपाययोजना,लॉकडाऊन नंतरच्या काय उपाययोजना याविषयी बोलायचं सोडून फक्त शो बाजी करत आहेत. . मोदी साहेब आपण पंतप्रधान आहात की एव्हेंट मॅनेजर आहात शंका वाटते, असं रुपाली चाकणकर म्हणाल्या.

दरम्यान, आपल्या सांगण्यावरून आम्ही थाळ्या वाजवल्या आता दिवे पेटवू फक्त तुम्ही एकदा आमच्या सांगण्यावरून व्हेंटिलेटरवर लागणारा 12 टक्के जीएसटी कमी करून कोरोना बाधित पेशंटला दिलासा द्यावा. असंही रुपाली चाकणकर यांनी म्हटलं आहे.


महत्वाच्या घडामोडी-

सांगली पोलिसांची कारवाई; आदेशाचं उल्लंघन करत सामूहिक नमाज पठण, 36 जण ताब्यात

वाटलं होतं चूल पेटवण्यासंबंधी बोलतील पण त्यांनी तर दिवा पेटवण्याचा उपदेश दिला- नवाब मलिक

“जनतेच्या आयुष्यात अंधार पसरलेला असताना वीज बंद करून दिवे लावायला सांगणे हा मूर्खपणा”

कोरोनाविरुद्धच्या या लढाईत भाजप राज्य सरकारसोबत आहे- देवेंद्र फडणवीस