आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शुक्रवारी केंद्र सरकारने लागू केलेले तिन्ही कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली.
शेतकऱ्यांना आम्ही समजावण्यात कमी पडलो आहोत. त्यामुळे आम्ही देशवासियांची माफी मागत आहोत असं म्हणत शेतकऱ्यांनी आता आंदोलन संपवून आपल्या घरी जावं, असं आवाहन पंतप्रधान मोदींनी केलं. यावरून आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली.
हे ही वाचा : नारायण राणेंनी सत्तेसाठी गद्दारी केली; शिवसेनेच्या ‘या’ आमदाराचा आरोप
‘नरेंद्र मोदी हे सहजासहजी माघार घेणारे नाहीत. त्यांनी माफी मागितली म्हणजे त्यांचा होमवर्क झालेला होता, असा टोला जयंत पाटलांनी यावेळी लगावला. मोदी कुठल्या ना कुठल्या पद्धतीने परत कायदे आणणार. त्यामुळे 2024 मध्ये भाजपचा पराभव करण्यासाठी कंबर कसली पाहिजे. 2024 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष करायचा आहे. जे येतील त्यांना येऊ द्या. त्यावर आक्षेप घेऊ नका, कारण संख्यात्मक महत्व असतं, अशी सूचना जयंत पाटलांनी यावेळी कार्यकर्त्यांना केली.
महत्वाच्या घडामोडी –
सातारा जिल्हा बँक निवडणुकीत शशिकांत शिंदेचा पराभव का झाला?; शरद पवारांनी दिलं उत्तर, म्हणाले…
“शिवसेनेचा भाजपला मोठा धक्का; रत्नागिरीच्या माजी उपाध्यक्षांचा शिवसेनेत प्रवेश”
“देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंच्या भेटीला; भाजप-मनसे युतीवर शिक्कामोर्तब होणार?”